आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Security Adviser Board Member Bank Hacked, 19 Lack Stolen

सुरक्षा सल्लागार मंडळ सदस्याचे बँक खाते हॅक,19 लाख रुपये लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आयआयटी कानपूरचे माजी संचालक व राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य संजय गोविंद धांडे यांचे बॅँक खाते हॅक करून अज्ञात भामट्यांनी 19 लाख रुपये काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी धांडे यांनी पोलिसांत तक्रारी दाखल केली आहे.


पोलिसांनी याप्रकरणी विनायक महादेव त्रिलोटकर (वय 27, रा. मुंबई) या आरोपीस अटक केली असून मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे. संजय धांडे हे पद्मश्री पुरस्कारप्राप्त असून ते राष्‍ट्रीय स्तरावर सायबर सुरक्षेबाबत माहिती पुरवत असतात. सप्टेंबर महिन्यात त्यांचे बॅँक खाते हॅक करून भामट्यांनी 19 लाख रुपये काढले होते. या बॅँक व्यवहाराचा कोणताही मेसेज धांडे यांच्या मोबाइलवर जाणार नाही याची दक्षताही भामट्यांनी घेतली. मात्र खात्यातील पैसे कमी झाल्याचे कळल्यावर धांडे यांना आपल्या खात्यातून परस्पर कोणीतरी पैसे काढल्याचे समजले. त्यामुळे धांडे यांनी चतु:शृंगी पोलिस चौकीत तक्रार दाखल केली.


गुन्हे शाखेच्या सायबर शाखेकडे तपास देण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक संजय तुंगार यांनी अधिक तपास करत एकाला ताब्यात घेतले.


आरोपीची चार राज्यात 11 बॅँक खाती
सहायक पोलीस आयुक्त गोपीनाथ पाटील म्हणाले, की आरोपी विनायक त्रिलोटकर हा एका खासगी कंपनीत मार्केटिंगचे काम करतो. त्याची पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान व महाराष्‍ट्र राज्यात एकूण 11 बॅँक खाती आहे. 50 हजारांची दोन ट्रॅन्झॅक्शन्स त्याच्या खात्यावर करण्यात आली आहे. या बदल्यात त्याला तीन हजार रुपये मिळालेले आहेत. त्याच्या फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.