आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या कार्यालयात सुरक्षा रक्षकाकडूनच लूट, पिंपरीत आठ ठिकाणी डल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पिंपरीतील खराळवाडी परिसरात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासह याच इमारतीतील आठ वेगवेगळया कार्यालयांवर चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे दोन लाख ३८ हजार रुपये लंपास केले. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे इमारतीसाठी तैनात केलेल्या सुरक्षा रक्षकांनीच आपल्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केली. त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयातील व्यवस्थापक व त्यांच्या मित्रास बांधून ठेवत बेदम मारहाणही केली.
खराळवाडी भागात साईकृपा भवन ही चार मजली व्यावसायिक इमारत आहे. या ठिकाणी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय आहे. तसेच याच इमारतीत इतरही कार्यालये हेत. या ठिकाणी एका नेपाळी सुरक्षा सुरक्षाकाची नेमणूक करण्यात आली होती. मंगळवारी पहाटे तीन ते चार चोरटे या इमारतीत शिरले. सुरुवातीला त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसून व्यवस्थापक रामदास मोरे (५६) व त्यांचे मित्र रिक्षाचालक दत्तात्रय साळुंखे (५०) यांना बेदम मारहाण केली. तसेच या दोघांनाही स्वच्छतागृहात डांबून ठेवले व कार्यालयातील कपाटातून ३५ हजार रुपये लंपास केले. याच इमारतीतील जीसी हाउसिंग अँड फायनान्स, संकेत कम्युनिकेशन, एसरएल डायग्नोस्टिक सर्व्हिसेस, कृपलानी बिल्डर्स व एलयसी या कार्यालयातील चोरट्यांनी हात साफ केला. या सर्व कार्यालयातून मिळून चोरट्यांनी एकून दोन लाख ३८ हजार रुपयांची रक्कम लंपास केली आहे. घटनास्थळी एका कार्यालयातून पोलिसांनी चोरट्यांचा एक मोबाइल, कटवाणी जप्त केली आहे.