आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See First World War Reflection In Pune International Film Festivel

महायुद्धाचे पडसाद ‘ पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्येही उमटणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - जगाला आगीच्या लोळात गुरफटून टाकणा-या पहिल्या महायुद्धाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच युरोपचा नकाशा पुन्हा बदलणा-या बर्लिन वॉलच्या पडण्यालाही यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन्ही जागतिक महत्त्वाच्या घडामोडींचे प्रतिबिंब यंदाच्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ)मध्ये उमटणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

१३ वा पिफ ८ ते १५ जानेवारी दरम्यान पुण्यात आयोजिण्यात आला आहे. जागतिक बदल घडवणा-या उपरोक्त दोन्ही घटनांकडे आधुनिक चित्रपट दिग्दर्शकांनी कसा नजरेने पाहिले, याची संवेदनशील नोंद घेणारे चित्रपट पिफमध्ये पाहता येणार आहेत. ‘जागतिक शांततेचा संदेश आणि मानवता’ हीच पिफची मध्यवर्ती संकल्पना आहे, असे डॉ. पटेल म्हणाले.

पिफची वैशिष्ट्ये
- ८० हून अधिक देशांचे ६०० चित्रपट पाहण्याची संधी
- महोत्सवात १३ विविध विभागांत चित्रपट सादर होणार
- प्रथमच पिंपरी-चिंचवडमध्येही स्क्रीनिंग्ज होणार
- मराठी स्पर्धात्मक विभागात ४१ चित्रपट
- स्टूडंट विभागात जगातल्या १०६ फिल्म स्कूल्सचा सहभाग
प्रतिनिधी नोंदणी सुरू