पुणे-
इंडियन प्रीमियर लीग (
IPL) च्या आठव्या सत्रातील तिसरा सामना आज किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पुण्यात होत आहे. पुण्याजवळील गहुंजे येथील सहारा स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. यासाठी दोन्ही संघ खूप मेहनत घेत आहेत. मात्र, फावल्या वेळेत मूड रिफ्रेश करण्यासाठी काही खेळाडू हॉटेलमधील किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवत आहेत तर काही जण इनडोअर गेम खेळत आहेत.
बुधवारी प्रॅक्टिसच्या दरम्यान विरेंद्र सेहवाग, मिशेल जॉन्सन, डेविड मिलर आणि अक्षर पटेल कॅरम खेळताना दिसले. तर दुसरीकडे, किंग्स इलेव्हन पंजाबचा स्टार खेळाडू शॉन मार्श
आपली पत्नी रेबेका हिच्यासोबत हॉटेलमधील किचनमध्ये आढळून आला. डेविड मिलर आणि हेंड्रिक्स यांनीही किचनकडे मोर्चा वळविला. दोघेही जण तासाभरासाठी शेफ बनले होते. मिलरने रोस्टेड चिकेन सॅंडविच बनवले तर हेंड्रिक्सने पिझ्झा तयार केला.
पुढील स्लाईड्सद्वारे छायाचित्रातून पाहा, किंग्स इलेव्हन पंजाबच्या प्लेयर्सनी कसा केला एन्जॉय...