आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाडगावकर म्हणत, पंतप्रधानांनंतर देशात दुसरे सर्वात महत्त्वाचे काम मी करतोय...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे शुक्रवारी सकाळी येथील एका रुग्णालयात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. १८ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर त्यांच्या अन्य अवयवांनी काम करणे बंद केले होते. पाडगावकर एक प्रख्यात लेखक व टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राचे माजी संपादक होते.

२०१० मध्ये जम्मू-काश्मीरमधील हिंसाचारादरम्यान फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्यासाठी नेमलेल्या तीनसदस्यीय समितीत पाडगावकर यांचा समावेश होता. यासंदर्भात ते एकदा म्हणाले होते, पंतप्रधानांनंतर देशात दुसरे सर्वात महत्त्वाचे काम मी करत आहे. भारत-अमेरिका संबंधांबाबत त्यांनी लिहिले होते की, मला वाटते अमेरिकी धोरण सफरचंदाच्या दोन तुकड्यांच्या रूपात पाहिले जावे. पाकिस्तानच्या वाट्याला मोठा भाग अाला आणि भारताकडे छोटा, असे म्हणू शकत नाहीत. अमेरिकेचे धोरण गोंधळलेले व द्विधा अवस्थेतील आहे. यामध्ये जेवढे दिसते तेवढेच वास्तव नाही. क्लिंटन यांचा भारत दौरा व वाजपेयी यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे दोन्ही देशांत जवळीक आणखी वाढली हे खरे आहे.

पत्रकार राजदीप देसाई यांनी आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले की, माझे पहिले संपादक दिलीप पाडगावकर एक संस्कारशील व बुद्धिमान व्यक्ती होते. एक अशी व्यक्ती ज्यांनी तरुणांच्या प्रतिभेला प्रोत्साहन दिले. पंतप्रधान मोदी यांनी लिहिले की, दिलीप पाडगावकर प्रमुख विचारवंत होते. पत्रकारितेतील त्यांचे योगदान कायम लक्षात राहील. त्यांच्या निधनाने मी दु:खी आहे.

२४ व्या वर्षी पॅरिसमध्ये टाइम्सचे वार्ताहर
पाडगावकर यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे शिक्षण सेंट व्हिन्सेंट हायस्कूल व फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. त्यांनी फ्रान्सच्या पॅरिस-सॉर्बाेन विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षापासून पत्रकारितेला सुरुवात केली. १९६८ मध्ये पॅरिसमध्ये ते टाइम्स ऑफ इंडियाचे वार्ताहर होते. १९८८ मध्ये ते संपादक झाले. ते सहा वर्षे संपादक राहिले. १९७८ ते १९८६ दरम्यान त्यांनी बँकॉक व पॅरिसमध्ये युनेस्कोसोबत काम केले.
बातम्या आणखी आहेत...