आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ कवयित्री सरिता पदकी यांचे अमेरिकेत निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ज्येष्ठ कवयित्री, कथाकार आणि बालसाहित्यकार सरिता पदकी (87) यांचे रविवारी अमेरिकेत निधन झाले. साठोत्तरी मराठी साहित्यात पदकी यांचे लेखन लक्षणीय मानले जाते.
सरिता पदकी यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण (एमए संस्कृत) पुण्यात झाले. काही काळ डेक्कन कॉलेज येथे कोश विभागात, फर्ग्युसन कॉलेजमध्ये संस्कृतचे अध्यापन, अर्थविज्ञानवर्धिनी, भारतीय शिक्षणशास्त्र संस्था अशा विविध ठिकाणी त्यांनी काम केले. कविता, कथा, अनुवाद आणि बालसाहित्य अशा विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. 'घुम्मट', 'बारा रामाचं देऊळ' हे त्यांचे कथासंग्रह गाजले. 'चैत्रपुष्प' हा त्यांचा लक्षणीय कवितासंग्रह असून त्यांची कविता सहज व भावमधुर स्वरूपाची आहे. 'गुटर्रगू', 'नाच पोरी नाच', 'जंमत टंपूटिल्लूची' असे त्यांचे बालसाहित्यही प्रसिद्ध आहे. अनुवादाच्या क्षेत्रात सरिताबाईंनी उल्लेखनीय कार्य केले. ह्यबाधाह्ण, ह्यखून पाहावा करूनह्ण आणि ह्यसीताह्ण ही त्यांची तीन नाटके वैशिष्ट्यपूर्ण मानली जातात. 'काळोखाची लेक' (करोलिना मारिया डी जीझस यांच्या ह्यचाइल्ड ऑफ द डार्कह्ण या ब्राझीलमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या निग्रो स्त्रीच्या आत्मनिवेदनाचा अनुवाद) तसेच युजीन ओनीलच्या नाटकाचा अनुवाद 'पांथस्थ', वेस्टिंग हाऊसच्या चरित्राचा अनुवाद 'संशोधक जादूगार', 'सात रंगांची कमान माझ्या पापण्यांवर' हे त्यांचे अनुवाद अतिशय गाजले.