आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Scientist Janyant Narlikar Got Sahitya Akadami Puraskar

ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या 'चार नगरातले माझे विश्व' या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच माधवी सरदेसाय यांना कोंकणी भाषेसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. मंथन या लेख संग्रहासाठी माधवी सरदेसाय यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
देशातील वरिष्ठ खगोलशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले नारळीकर हे मागील 40-45 वर्षापासून खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. याबरोबरच त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. आता त्यांच्या 'चार नगरातले माझे विश्व' या आत्मचरित्र पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
नारळीकर यांचे कला, साहित्य, विज्ञान क्षेत्रातील योगदान व मिळालेले पुरस्कार
आकाशाशी जडले नाते, विज्ञानाची गरुडझेप, गणितातील गमतीजमती, विश्वाची रचना, विज्ञानाचे रचयिते, नभात हसरे तारे, वामन परत न आला, अंतराळातील भस्मासुर, प्रेषित, व्हायरस, अभयारण्य, यक्षांची देणगी, टाइम मशीनची किमया, याला जीवन ऐसे नाव आदी विज्ञानावर आधारित पुस्तके लिहली आहेत.
पुरस्कार-
- 1965 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.

- 2004 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.
- 2010 साली त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.
- नारळीकरांना देशातील विज्ञान क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ असा भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला पुरस्कारही मिळाला आहे.
- 2014 साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार मिळाला.