आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेट’चा निकाल जाहीर उत्तीर्णांचे प्रमाण 4.3 %

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- विद्यापीठातील अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात 4.3 टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी किंचित सुधारली आहे. गेल्या वर्षी साडेतीन टक्के निकाल लागला होता.

सेट विभागाचे उपकुलसचिव रा. मा. राहरेकर यांनी ही माहिती दिली. विद्यापीठाकडे निकाल तयार होता, पण यूजीसी कमिटीच्या प्रत्यक्ष भेटी व मार्गदर्शनाशिवाय निकाल जाहीर करता येत नसल्याने निकाल लांबत गेला. सेट परीक्षेसाठी राज्यातून 85 हजार विद्यार्थी बसले होते. गोवा आणि महाराष्ट्रात ही परीक्षा एकदम घेण्यात आली. एक डिसेंबर 2013 रोजी झालेल्या या परीक्षेचा निकाल तब्बल सहा महिन्यांनी लागला त्यामुळे विद्यार्थी संभ्रमित अवस्थेत होते. एकूण 30 विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली.

सेट परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी नेट परीक्षेसाठीही प्रयत्न करतात. मात्र, सेटचा निकाल आज (12 जून) लागल्याने 29 जूनला असणारी नेटची परीक्षा देणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.