आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एक्स्प्रेस वे’वर सात जण ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे- मुंबई द्रुतगती महामार्ग वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळाच बनला आहे. महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याजवळ असलेल्या कळंबोलीजवळ सोमवारी पहाटे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका ट्रकवर भरधाव सुमो धडकली. या भीषण दुर्घटनेत सात जण ठार तर तीन जण जखमी झाले.

तुळशीदास चोरगे (रा.पाटण,सातारा), सचिन बेलगे (रा.मुंबई), मज्जू उर्फ मुजबीन शेख, जुबीर रसूल शेख, चंद्रशेखर (पूर्ण नाव समजू शकले नाही), कादर शेख, व संतोष धोत्रे (रा.मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. तर अर्जुन कुंडलीक घारे (21), सुरेश कुमावत व धनाजी दत्तात्रय लोटले हे जखमी झाले असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती कळंबोली पोलिसांनी दिली.

सोमवारी पहाटे कराडहून मुंबईच्या दिशेने निघालेली सुमो दु्रतगती महामार्गावरुन भरधाव वेगात प्रवास करत होती. पहाटे तीन वाजून 20 मिनिटांनी चालक धनाजी लोटले याचा वाहनावरील ताबा सुटल्याने सुमो रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर धडकली. या भीषण अपघातात सातजणांना जीव गमवावा लागला तर तीनजण गंभीररीत्या जखमी झाले. याप्रकरणाचा पुढील तपास कळंबोली पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक टी.व्ही.माने करत आहे.