आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'स्‍पेशल 26\': सात तोतया सीबीआय अधिकारी ठाण्यातून जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत पुण्यातील कयानी बेकरीचे मालक सोहराब होरमजदियार कयानी यांच्याकडून भामट्यांनी शनिवारी 21 लाख रुपये उकळले होते. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी सर्व आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख 20 हजार रुपये व स्कोडा कार जप्त केली. नीलेश सत्यवान सोनावणे, रुपेश सत्यवान सोनवणे, मनीष मोहनलाल ओझा, सुनील बंडू कसबे, प्रमोद देवचंद राठोड, राजेश लक्ष्मण शिर्के आणि अतुल परशुराम पाटणकर अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपींपैकी पाच जण शनिवारी कयानी यांच्या पुण्यातील गुलटेकडी येथील निवासस्थानी गेले. यानंतर त्यांनी आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत ‘तुम्ही हवाला रॅकेट चालवता’ असे म्हणत कयानी यांना धमकावले. त्यानंतर घाबरलेल्या कयानी यांनी त्यांना 21 लाख रुपये दिले.

कसा आला संशय? वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...