आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seven Killed In An Accident On Pune Mumbai Expressway

टायर फुटल्याने वाहन डंपरला धडकले, ७ ठार, मृतांत ४ महिला, दोन मुले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लोधिवली गावाजवळ सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये चार महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत. गाडीचे टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला.
धर्मराज धोंडे (४५), सुनीता धोंडे (४०), वेदांत धर्मराज धोंडे (१०), अश्विनी धोंडे (१५), चित्रा धोंडे (४०), शुभम पवार (७), सखुबाई पवार (४०) अशी मृतांची नावे आहेत. प्रतीक धोंडे (१६) आणि पूजा धोंडे (१५) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धोंडे कुटुंबीय मूळ सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील धोंडेवाडी येथील रहिवासी आहेत. कामानिमित्त ते नवी मुंबईत स्थायिक झाले आहेत. गणेशोत्सवासाठी ते सर्वजण गावाकडे आले होते. तेथून क्वालिस गाडीने ते नवी मुंबईकडे येत होते. या वेळी त्यांच्या क्वालिस गाडीचे टायर फुटल्याने गाडी विरुद्ध लेनवर शिरली आणि समोरून येणाऱ्या डंपरवर यात सात जण जागीच ठार झाले. परिसरातील नागरिकांनी मृतांना बाहेर काढत पोलिसांना याबाबत माहिती दिली.