आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाला पुन्हा काळिमा : पुण्यातील राष्ट्रीय शिबीरात सेक्स करताना आढळले खेळाडू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - भारतीय खेळ जगताला पुन्हा एकदा बट्टा लागला आहे. आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगमुळे संपूर्ण जगात देशाची नाचक्की होत असताना एका नेमाबाजाच्या कारनाम्यामुळे भारतीय खेळ विश्वाची मान पुन्हा शरमेने झुकली आहे. पुण्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबीरामध्ये एका नेमबाजाला सहकारी महिला खेळाडूसोबत एकाच खोलीत पकडण्यात आले आहे. हे दोन्ही खेळाडू झारखंडमधील आहेत.

ही घटना पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (एएसआय) येथे सुरू असलेल्या शिबीरादरम्यान घडली आहे. या घटनेबद्दल एकही अधिकारी किंवा खेळाडू बोलण्यास तयार नाही.( याआधीही एएसआय वादाच्या भोव-यात अडकले होते. )

येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय शिबीरात एका पुरुष नेमबाज खेळाडूला सहकारी महिला खेळाडूच्या रुममध्ये सेक्स करताना पकडण्यात आले. या वृत्ताला नेमाबाज संघटनेचे कोषाध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, ही घटना अतिशय लाजिरवाणी आहे. हे दोघेही महिला खेळाडूच्या रुममध्ये आक्षेपार्ह्य स्थितीत आढळले. त्यानंतर दोघांनाही एएसआय आणि भारतीय नेमबाज संघटनेनी आपापल्या स्तरावर शिक्षा केली आहे.

एएसआयने नियमांचा भंग केल्याप्रकरणी दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवला तर, नेमाबाज संघटनेने त्यांच्या आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांवर बंदी घातली आहे. आता हे प्रकरण शिस्त पालन समितीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. सात दिवसांच्या आत दोघांना खुलासा सादर करण्यास सांगण्यात आला आहे. आक्षेपार्ह्य स्थितीत सापडलेल्या दोन्ही खेळाडूंनी लिखित स्वरूपात चुक मान्य केली आहे.