आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sex Racket Blast Pune Police In Kondhwa, Women Agent Arrest

पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; महिला एजंट अटकेत, युवतीची सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणा-या एका महिलेस पुणे पोलिस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून पोलिसांनी एका युवतीची सुटका केली आली. संगिता किशोर त्राविडन (वय 44, कौसरबाग सोसायटी, कोंढवा पुणे, मूळगाव केरळ) असे अटक करण्यात आलेल्या महिला एजंटचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला मुलींना घरी बोलवून वेश्या व्यवसाय करवून घेत होती. आर्थिक गरज असलेल्या मुलींना हेरून पैशाचे लालूच दाखवून जाळ्यात ओढायची व त्यांच्याकडून वेशाव्यवसाय करून घ्यायची. वेश्या व्यवसायातून मिळालेल्या पैशांतून निम्मी ती स्वतः घेत असे व उर्वरित मुलींना देत असे. संगिता त्राविडन नावाची महिला घरातच वेश्या व्यवसाय चालवते. तसेच मुलींची मागणी करणा-या ग्राहकास आपल्या राहत्या घरी बोलावुन तिच्याजवळील मुली दाखवुन घरातच त्यांच्याकडुन वेशाव्यवसाय करुन घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने संगीता त्राविडन राहत असलेल्या फ्लॅटवर धाड टाकली असता त्या ठिकाणी वेशाव्यवसाय होत असल्याचे त्यांना आढळुन आले. यावेळी एका युवतीची सुटका करण्यात आली.
संगिता त्राविडन हिच्याविरूद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संगिता त्राविडन हिला अटक केली आहे. राजकुमार वाघचवरे, नीता मिसाळ, गणेश जगताप, नितीन तेलंगे आदी पोलिस कर्मचा-यांनी या सेक्स रॅकेटचा पदार्फाश केला आहे.