आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्यूटी पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; व्हीआयपी ग्राहकांसाठी \'खास\' ट्रीटमेंट!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुणे शहरातील विमान नगरात ब्यूटी पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात देहविक्रीचा गोरखधंदा खुलेआम सुरु आहे. विशेष म्हणजे या ब्यूटी पार्लरमध्ये व्हीआयपी ग्राहकांसाठी खास सेवाही दिली जात होती. पुण्याच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एका ब्यूटी पार्लरचा भांडाफोड करून तीन आरोपींना जेरबंद केले आहे. तसेच बांगलादेशातील एक आणि दिल्लीत एक अशा दोन तरुणींची या देहविक्रीच्या दलदलीतून बाहेर काढले आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस कॉन्टेबल सोहनलाल चुटले यांना फातिमा नगरातील 'हर्बल ब्यूटी पार्लर'मध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून या प्रकरणाची भांडाफोड केला. पोलिसांनी विमान नगरात राहणारे नागार्जुन रविंदर, येरवडा येथील सारिका प्रवीण खुडे (24) आणि घोरपडे येथील प्रमिला सुदर्शन गुंडे (34) या तिघांना अटक केली आहे.

पुढील स्लाइडस क्लिक करून वाचा... 'पुण्यातील विमान नगरात सुरु होता ब्यूटी पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना'