आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍याच्‍या बदनाम गल्‍लीतून केली ‘तिची’ सुटका; सिक्‍कीममधून आणले होते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र
पुणे – जीवनात खूप काही करायचे, अशी स्‍वप्‍न पाहात असलेली ती. पण, अचानक कोवळ्या वळणावर पाय घसरला नि फसवणूक झाली. परिणामी, ती थेट सिक्‍कीमधून पुणे शहरातील बदनाम गल्‍ली असलेल्‍या बुधवारपेठेत आली. या ठिकाणी तिची एका एजंटला विक्री करण्‍यात आली होती. मात्र, पोलिसांनी मारलेल्‍या छाप्‍प्‍यामुळे तिची सुटका झाली. या प्रकरणी दीपक वामन सरवदे ( मु.रा.अहमदपूर, जि. लातूर) या दलालाला पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. ही कारवाई काल (शनिवार) करण्‍यात आली. सामाजिक सुरक्षा विभागाचे सचिन कोकरे यांना माहिती मिळाली होती की, सरवदे हा परराज्यातील मुलींकडून बंडगार्डन व कोरेगावपार्क परिसरात वेश्याव्यवसाय करून घेत आहे. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून सरवदे याला अटक करून तरुणीची सुटका केली.
पुढील स्‍लाइडवर वाचा – वेश्‍याव्‍यवसायातून होते अब्‍जावधी रुपयांची उलाठाल....
बातम्या आणखी आहेत...