आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्‍यात सेक्‍स रॅकेटः वेश्याव्यवसाय करणा-या दोन अभिनेत्रींना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चित्रपट व दूरचित्रवाहिनीवरील विविध मालिकांतील सहकलाकार मुलींना वाममार्गाला लावणा-या दलाल जोडप्यास पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. स्मिता धिवार व तिचा पती दिनेश धिवार यांच्यासह मुंबईतील दोन कलाकार मुलीही ताब्यात घेण्यात आल्या. न्यायालयाने धिवार जोडप्यास 6 आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी, तर दोन्ही मुलींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्यात सेक्स रॅकेट्स मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत आहेत. यात काही टीव्ही अभिनेत्री व परदेशी मुलींचाही समावेश आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस उपनिरीक्षक अश्विनी जगताप यांना या रॅकेटबाबत माहिती मिळाली होती. मुंबई येथे बॉलीवूडमध्ये कास्टिगंचे काम करणारे धिवार जोडपे पुणे व मुंबई या ठिकाणी दूरचित्रवाहिनीत काम करणा-या मुलींमार्फत वेश्याव्यवसाय करत आहे. बातमीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी स्मिता धिवारशी बनावट गि-हाइकाच्या माध्यमातून संपर्क साधला. स्मिताने तिचा पती दिनेश याच्या बॅँक खात्यावर 10 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर धिवार जोडप्याने मालिकेत काम करणा-या दोन मुलींसह पुण्यात मंगळवारी रात्री येण्याचे कबूल केले. मुलींसाठी दोन तासांचे प्रत्येकी 50 हजार रुपये घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार पोलिसांनी शिवाजीनगर भागातील एका हॉटेलवर सापळा रचून दलाल महिला, तिचा पती व दोन मुलींना पिटा कायद्यांतर्गत अटक केली. पोलिसांच्या चौकशीत पंजाबहून आलेल्या मुलीने सांगितले की, मी साडी शो, सलवार कमिजचे शो केले आहते. त्याचबरोबर स्टार प्लस या चॅनलवरील ‘साथीया’ व कलर्स चॅनलवरील ‘ससुराल सिमरन का’ या मालिकांत सहकलाकाराचे काम केले आहे.
गुजरातवरून आलेल्या मुलीने सांगितले की, तिने मुंबईत आल्यावर ‘बडी नवाब’ या चित्रपटात सहकलाकाराचे काम केले आहे. दोघींना मिळणा-या पैशातून खर्च भागत नसल्याने कधी तरी वेश्याव्यवसायाचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

एका दलालास अटक
परराज्यातील मुलींना पुणे शहरात आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करुन घेणारा दलाल हुसेन सलिम शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे कमर्चारी संदीप होळकर यांनी भोसरी येथे सापळा रचून शेख यास अटक केली. त्याच्या ताब्यातून पश्चिम बंगालमधील एका मुलीची सुटका करण्यात आली आहे.
टीव्‍ही अभिनेत्रींचे सेक्‍स रॅकेट उघडकीस
सेक्‍स रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली सिनेअभिनेत्री पद्मजा बापटला पुण्यात अटक
पुण्‍यात \'पंचतारांकित\' सेक्‍स रॅकेटवर छापा, अभिनेत्रीस अटक