आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sex Scandal Webpage Maker Arrested, Defamed Young Girl On Facebook

सेक्स स्कँडलचे वेबपेज तयार करणारा अटकेत, तरूणीची फेसबुकवर केली बदनामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - कोपरगाव येथील एका युवतीचे फेसबुक अकाउंट हॅक करत त्यावर कोपरगाव सेक्स स्कॅँडलचे पेज तयार करून युवतीची बदनामी करणा-या भामट्याला पुणे पोलिसांनी अटक केली. ब्रिजमोहन लोंगानी (29, कोपरगाव) असे आरोपीचे नाव आहे. ब्रिजमोहन याचे कोपरगावात कापड दुकान आहे. त्याने कोपरगावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या 27 वर्षीय मुलीचे फेसबुक अकाऊंट हॅक केले
होते. त्यानंतर मूळ फेसबुक अकाउंटवरून त्याने अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ‘मी एकटी आहे...’ असे अश्लील मेसेजही त्याने अनेकांना पाठवले होते. सप्टेंबर ते ऑक्टोबर 2013 मध्ये त्याने हा प्रकार केला असून त्यामुळे पीडित मुलीस मनस्ताप सहन करावा लागला होता.
सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार आल्यानंतर पोलिसांनी ब्रिजमोहन याला अटक केली. चौकशीत त्याने कोपरगाव सेक्स स्कॅँडल ग्रुप तयार करून त्यावर चॅटिंग सुरू केल्याचे निष्पन्न झाले. हे अकाउंट पोलिसांनी बंद केले असून त्याला साथ देणा-या एका संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत. आरोपीने अशाच प्रकारे आणखी दोन अन्य अकाउंट तयार केल्याचे आढळले आहे. आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आल्यावर त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. नंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.