आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाकडून अल्‍पवयीन विद्यार्थीनीवर अतिप्रसंग, बारामतीमधील धक्‍कादायक प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बारामती तालुक्यातील माळेगाव येथील प्रख्यात शिक्षण संस्थेत शाळेतील शिक्षकाकडूनच 10 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अतिप्रसंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

 

बुधवारी संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळी शिक्षकाने हे दृष्यकृत्य केले. अल्वयीन पिडित मुलगी संध्याकाळी घरी पोहचल्यावर तिने पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर बुधवारी रात्री मुलीच्या आई वडिलांनी मुलीसह बारामती तालुका पोलीस स्‍टेशनमध्‍ये धाव घेत यासंबंधी तक्रार दिली. बारामती पोलिस स्‍टेशनचे अंमलदार यांनी याप्रकरणी तक्रार दाखल करण्‍यात आली असून पोलीस निरिक्षकांच्या परवानगी नंतर पत्रकारांना गुन्ह्याची माहिती दिली जाईल, असे सांगितले आहे. पोलीस निरिक्षक सुरेंद्रसिंह गौंड यांना विचारले असता त्‍यांनी आरोपी शिक्षकाला ताब्‍यात घेण्‍यात आले आहे, अशी माहिती दिली. मात्र आरोपी शिक्षक व संबधित शिक्षण संस्थेचे नाव सांगण्यास त्‍यांनी नकार दिला.  

 

पोलिसांवर दबाव?
राजकीय वरदहस्त लाभलेल्या शिक्षणसंस्थाचालकाकडून या प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्‍हणून पोलीसांवर मोठा दबाव टाकला जात असल्‍याची माहिती आहे. पोलिसांकडून अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न सुरू असल्‍याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...