Home »Maharashtra »Pune» Sexual Harassment Minor Girl At Pune

पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत सुरक्षारक्षकांनीच केला पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

दिव्य मराठी वेब टीम | Sep 13, 2017, 17:13 PM IST

पुणे- पिंपरी चिंचवडमधील वाकड येथे एका उच्चभ्रू सोसायटीतील दोन सुरक्षारक्षकांनी पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोन्ही भामट्यांना अटक केली आहे. रंजित चासा आणि मंगल वैद्य अशी आरोपींची नावे आहेत.

काय आहे हे प्रकरण..?
पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार, वाकडमधील उच्चभ्रू वसाहतीत आरोपी हे सुरक्षारक्षकाचे काम करतात. हे दोघे ही मूळचे आसामचे आहेत.
- पाच वर्षांची मुलगी वसाहतीच्या पार्किंगमध्ये खेळत असताना नराधम सुरक्षारक्षकांनी तिला लिफ्टच्याशेजारील कोपऱ्यात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला.
- याबाबत कुठे ही वाच्यता करायची नाही, अशी धमकी नराधमानी पीडित चिमुरडीला दिली.
- मात्र, पीडित मुलीला प्रचंड वेदना होत असल्याने तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन सर्व माहिती विचारली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
- दोन्ही नराधमांच्याविरोधात वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Next Article

Recommended