आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसएफअाय कार्यकर्त्यांच्या माेर्चाला पाेलिसांनी परवानगी नाकारली, पुणे विद्यापीठात गाेंधळ सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात आक्षेपार्ह पोस्टर लावण्यावरून दोन विद्यार्थी संघटनांमध्ये सुरू झालेला गोंधळ साेमवारीही कायम हाेता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या दोन्ही संघटनांचे विद्यार्थी आणि कार्यकर्ते या मुद्द्यावरून भिडले आहेत. अभाविपच्या निषेधार्थ ‘एसएफअाय’च्या विद्यार्थ्यांनी साेमवारी माेर्चाची हाक दिली हाेती, मात्र जमावबंदीमुळे पाेलिसांनी त्यांना परवानगी नाकारली.
 
त्यामुळे या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात अांदाेलन केले. दरम्यान,‘एसएफअाय’च्या विराेधात अभाविपच्या कार्यकर्त्यांनीही साेमवारी शनिवारवाडा ते काैन्सिल हाॅल दरम्यान माेर्चा काढून निदर्शने केली.
 
एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी विद्यापीठात निषेध मोर्चासाठी पोलिस परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी ती नाकारली. त्यानंतरही विद्यार्थ्यांनी विद्यापीठात जमून घोषणाबाजी केल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला. ‘अभाविपला शनिवारवाड्यापासून मोर्चाची परवानगी मिळते, पण आम्हाला (एसएफआय) मात्र विद्यापीठात परवानगी मिळत नाही. दोन्ही संघटनांबाबत एकाच विषयावर दुजाभाव दाखवला जात आहे. विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी,’ अशी मागणी एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केली.    
 
दरम्यान, पोलिसांनी विद्यापीठात जमावबंदी लागू केली आहे तरीही काही ठिकाणी विद्यार्थ्यांकडून आक्रमक घोषणाबाजी सुरू होती. विद्यापीठातील अनिकेत कँटीन परिसरात दुपारी साडेबारानंतर एसएफआयने अभाविप तसेच मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ‘अभाविपच्या गुंडगिरीला आम्ही घाबरत नाहीत. लोकशाही मार्गाने आम्ही निषेध व्यक्त करणारच,’ असे एसएफअायचे  महारुद्र डाके यांनी सांगितले. संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी एसएफआयच्या अांदाेलनाला पाठिंबा जाहीर केला अाहे.

दरम्यान, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी ‘एसएफअाय’कडून दडपशाही हाेत असल्याचा अाराेप करत साेमवारी शनिवारवाड्यापासून माेर्चा काढत निदर्शनेही केली.
बातम्या आणखी आहेत...