आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहीर हेमंत मावळे, प्रभा शिवणेवकर यांना पठ्ठे बापूराव पुरस्‍कार जाहीर, लोककला क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहीर हेमंत मावळे. - Divya Marathi
शाहीर हेमंत मावळे.
पुणे-  लोककला आणि लोकनाट्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शाहीर हेमंत मावळे आणि लोकनाट्य कलाकार प्रभा शिवणेकर यांना पुणे महानगरपालिकेचा मानाचा पठ्ठे बापूराव पुरस्कार जाहीर झाला आहे. मनपाने 2015 आणि 2016 अशा दोन वर्षांचे पुरस्कार एकत्रित जाहीर केले आहेत. शाहीर मावळे यांना 2015 सालासाठी तर प्रभा शिवणेकर यांना 2016 साठीचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
 
24 मे रोजी सकाळी अकरा वाजता महापौर मुक्ता टिळक आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख अकरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शाहीर मावळे गेली 35 वर्षे सातत्याने शाहिरी क्षेत्रात कार्यरत आहेत. विनामूल्य पोवाडा प्रशिक्षणही ते देतात. शिवणेकर याही अनेक वर्षे 'गाढवाचं लग्न' या वगनाट्यात गंगी ही भूमिका साकारत आहे.
 
बातम्या आणखी आहेत...