आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shanivaar Wada\'s Main Door Open For 1 Hour Today

284 वर्षानंतर शनिवार वाड्याचा मुख्य दरवाजा उघडला, पर्यटकांना तासाभरासाठी पर्वणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवार वाड्याचा मुख्य दरवाजा उघडल्यानंतर आतील नजारा असा दिसतो. - Divya Marathi
शनिवार वाड्याचा मुख्य दरवाजा उघडल्यानंतर आतील नजारा असा दिसतो.
पुणे- पेशव्यांची व पुण्याची ऐतिहासिक ओळख असलेल्या शनिवारवाड्याचा मुख्य दरवाजा आज एक तासासाठी उघडण्यात आला. 284 वर्षापूर्वी म्हणजेच 22 जानेवारी 1732 साली शविवार वाड्याची वास्तूशांती करण्यात आली होती. त्याचनिमित्ताने यंदापासून दरवर्षी 22 जानेवारीला आता मुख्य दरवाजा पर्यटकांसाठी उघडण्यात येणार आहे.
शनिवार वाड्याची जबाबदारी 1913 सालापासून पुरातत्व खात्याकडे आहे. पुण्यातील काही इतिहास तज्ञ्जांनी आजच्या दिवसाचे महत्त्व सांगून आजच्या दिवशी एक तासासाठी मुख्य दरवाजा उघडण्याची विनंती पुरातत्व खात्याकडे केली होती. त्यानुसार पुरातत्व विभागाने हा दरवाजा उघडला होता.
सकाळी 11 च्या सुमारास हा दरवाजा तासाभरासाठी उघडण्यात आला होता. त्यावेळी पर्यटकांनी मुख्य दरवाजातून प्रवेश करीत शनिवारवाडा पाहण्याची संधी गमावली नाही. पेशव्यांच्या काळापासूनच हा दरवाजा गरजेनुसार कधीतरी उघडला जात असत. पेशव्यांचे घोडे व हत्ती या मुख्य दरवाजातूनच वाड्यात प्रवेश करीत असत असे सांगितले जाते.
सध्य स्थितीत हा मुख्य दरवाजा वर्षातून चार दिवसच एक तासासाठी उघडण्यात येत होता. 15 जानेवारी, 26 जानेवारी, 1 मे आणि 15 ऑगस्ट आदी दिवशीच हा दरवाजा 1 तासासाठी उघडला जात असे. आता यापुढे 22 जानेवारीलाही हा मुख्य दरवाजा एक तासासाठी उघडला जाणार आहे.
पुढे वाचा, कसा व कोणी बांधला शनिवारवाडा...