आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक प्रचारात थेट शांताबाई, पुण्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची शक्कल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सध्या राज्यभर निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आलेली पहायला मिळत आहे. प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून आगळ्या-वेगळ्या शक्कली लढवल्या जात आहेत. अशीच एक वेगळी शक्कल पुणे महापालिकच्या निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रिया गदादे आणि त्यांचे बंधू प्रेमराज गदादे यांनी लढवली आहे. 

गदादे बंदू-भगिनीने निवडणुकीच्या प्रचारात चक्क शांताबाईंना उतरवले आहे. गेल्या वर्षभरात गाजलेल्या शांतबाई गाण्याचा अत्यंत रंजक पद्दतीने वापर करण्यात आला आहे. शांताबाई... शांताबाई... गदादे पाटलांना तोडच नाही. असे या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन तयार करण्यात आले आहे.  

पुणे महापलीकेच्या प्रभाग क्रमांक 30 (ब) मधून विद्यमान नगरसेविका प्रिया गदादे निवडणूक लढवत आहेत, तर प्रभाग क्रमांक 30 (ड) मधून त्यांचे बंधू प्रेमराज गदादे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहे. दोघाभावंडांनी गाण्याच्या मध्यामातून थेट शांताबाईलाच निवडणूकीच्या रिंगणात उतरवल्याने दोन्ही उमेदवारांच्या नावाची जोरात चर्चा सुरू आहे. प्रचारासाठी तयार करण्यात आलेला हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच प्रसिद्ध झाला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा प्रचारातील शांताबाई गाण्याचा व्हिडिओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...