आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांनो, शेती सोडून राजकारणात पडू नका; पवारांचा मोलाचा सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - राजकारणात अव्याहतपणे वाहत जाऊन कामधंदा न करता राजकीय झेंडे खांद्यावर घेऊन मिरवणाऱ्या तरुणांना पन्नास वर्षे राजकीय कारकीर्द गाजवणाऱ्या शरद पवार यांनी मोलाचा सल्ला दिला. पवार म्हणाले, अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील तरुण शेती सोडून राजकारणात येत आहेत. तरुणांनी राजकारणात येण्यास आपला आक्षेप नाही.
 
मात्र, त्यांनी  शेती सोडून राजकारणात अधिक रस घेतल्यास देशाच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होतील, अशी चिंता व्यक्त करत पवार यांनी शेतीचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. ते बारामती येथे केंद्र सरकारच्या संकल्प ते सिद्धी या प्रकल्पांतर्गत जागतिक मधमाशी दिन तसेच बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

 पवार म्हणाले, सध्या पाऊस नसल्याने महाराष्ट्रात दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दरम्यान,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही शेतकऱ्यांना उद्देशून देशद्रोही संबाेधले होते. यावर पवार यांनी भाष्य करण्याचे टाळले.
 
बातम्या आणखी आहेत...