आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Asking Question About Farmer Suicide

व्होडाफोनचे ३२०० कोटी माफ, शेतकऱ्यांचे काय? शरद पवार यांचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच मदत न केल्यास साखर कारखानदारी धोक्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. व्होडाफोनचे ३२०० कोटी माफ होऊ शकतात, मग गरीब शेतकऱ्यांकडे कोण बघणार? असा सवालही त्यांनी केला.
येत्या १४ तारखेला बारामतीत येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे साखर
उद्योगाच्या समस्या मांडणार का, या प्रश्नावर "त्यासाठी थांबायची गरजच काय? आताही दिल्लीला जाऊन मी त्यांना भेटू शकतो,’ असे पवार म्हणाले.

कारखानदारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील यांनी गुरुवारी पुण्यात बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी पवार होते. बैठकीनंतर पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘व्होडाफोन'कडील ३ हजार २०० कोटींच्या करवसुलीबाबत सर्वोच्च न्यायालयात आव्हान न देण्याचा निर्णय सरकारने घेतला. ‘व्होडाफोन'चे ३ हजार २०० कोटी माफ होऊ शकतात. गरीब शेतकऱ्याचे कोण बघणार, असा सवाल त्यांनी केला.
२ हजार कोटींची मदत हवी
राज्यातील सुमारे ४५० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. आणखी ५० टक्के गाळप व्हायचे आहे. २२ लाख ऊस उत्पादकांचा ऊस शिल्लक आहे. एफआरपी ठरली तेव्हा साखरेचा भाव ३१०० रुपये क्विंटल होता. आता तो २३५० पर्यंत घसरला आहे. सरकारने सुमारे दोन हजार कोटींची मदत न केल्यास साखर उद्योग अडचणीत येईल, असा इशारा पवारांनी दिला.