आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समान नागरी कायदा परवडणार नाही - पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - भाजप देशात समान नागरी कायदा आणू पाहत आहे. मात्र अजूनही समाज खूप पाठीमागे आहे. त्यामुळे घटना बदलणे देशाला परडवणारे नाही. राममंदिराच्या मुद्द्याचा प्रचार करणारे भाजपवाले अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना मात्र किंमत देत नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मोदींची हिटलरशाही देशात चालणार नसल्याचा दावाही त्यांनी केला.
बारामतीतील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ दौंड येथे घेतलेल्या सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले की, लोक भ्रष्टाचाराने पिचून गेले आहेत. सिंचन घोटळ्याचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर यावे, त्यातून सत्य जनतेला कळावे. राष्ट्रवादी कॉँग्रेस भ्रष्टाचाराला कदापिही थारा देत नाही. गोपीनाथ मुंडेंवर टीका करताना ते म्हणाले की, कौटुंबिक जीवनात आई चांगल्या मुलाकडे राहते. ज्यांना आईला प्रेम देता येत नाही ते इतरांना काय सांगतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ठाकरे बंधूच्या भांडणांची खिल्ली उडवत पवार म्हणाले की, त्यांच्या वादाने राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत. वाघाला बछड्याला आपण वाघ असल्याचे सांगावे लागत नसल्याचे पवार म्हणाले.
महायुतीवर टीका करताना पवार म्हणाले की, महायुतीतील घटक पक्ष स्वत:ला पाच पांडव म्हणवतात. आता सहावा पांडव आल्याने षटकार तयार झाला आहे. आता सहाला काय म्हणतात? त्यांची द्रौपदी कोण? अशी खिल्लीही उडविली. महायुती टोल व वीज बील माफी करूच शकत नसल्याचा दावाही पवारांनी केला.