आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे मला जमलं नाही ते अजित पवारांनी करून दाखवलं; शरद पवारांचा दादांना टाेला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती- धरणासंदर्भात केलेले वादग्रस्त वक्तव्य अंगलट अाल्यानंतर दाेन वर्षांपासून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अगदी ताेलूनमापूनच बाेलत असतात. मात्र, नुकतेच साेलापूर जिल्ह्यातील एका जाहीर सभेत त्यांची जीभ पुन्हा घसरली. चूक लक्षात अाल्यानंतर क्षणार्धात दादांनी सारावासारवही केली.

मात्र, त्यांचे काका व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मात्र कदाचित ते विसरले नसावेत. दिवाळीनिमित्त शुक्रवारी बारामतीत अायाेजित एका कार्यक्रमात ‘जे अाम्हाला जमलं नाही ते दादांनी करून दाखवलं’ असे उपराेधिक ‘काैतुक’ करून त्यांनी अजितदादांना चूक लक्षात अाणून दिली.

अकलूज येथील सभेत त्यांनी अापल्या कामाची स्वत:च प्रशंसा केली हाेती. मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या शरद पवारांच्या तुलनेत अापण कमी वेळात अधिक कामे केल्याचा दावाही केला हाेता. त्यासाठी बारामती परिवहन कार्यालयाच्या निर्मितीचे उदाहरणही दिले हाेते. शुक्रवारी दिवाळीनिमित्त बारामतीत एका खासगी रुग्णालयाचे उद‌्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. अजित पवारही व्यासपीठावर उपस्थित हाेते. या वेळी भाषणात शरद पवार म्हणाले, ‘बारामतीत वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी स्थानिक लाेकांनी माझ्याकडे अनेकदा पाठपुरावा केला हाेता. मात्र, या महाविद्यालयासाठी देणगी उभारणे अापल्याला काही जमले नसते. त्या वेळी राज्य सरकारमध्ये अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी मात्र या महाविद्यालयासाठी भरघाेस निधी मंजूर केला.’ या वक्तव्यातून ‘अापल्याला जे जमले नाही ते दादांनी तेव्हा करून दाखवले,’ असा टाेला माेठ्या पवारांनी लगावून अजित पवारांच्या वक्तव्याचा ‘हिशेब’ पुरा केल्याचीच चर्चा कार्यक्रमानंतर हाेत हाेती.
बातम्या आणखी आहेत...