आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांच्या स्वप्नात आणखी 26 ‘लवासा’, माध्यमांना विरोधी प्रसिद्धी न देण्याचा उपदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘लवासा सिटीसारखे आणखी 26 प्रकल्प राज्यात सुरू होऊ शकतात. या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळेल, परंतु त्यासाठी विकासाकडे पाहण्याचा मानसिक दृष्टिकोन बदलावा लागेल. माध्यमांनीही विकासाच्या आड येणार्‍या घटकांना अवास्तव प्रसिद्धी देऊ नये,’ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात मांडली. प्रकल्पविरोधी घटकांना प्रसिद्धी दिल्यामुळे विकास रखडतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
मराठा चेंबर ऑफ कॉर्मस, इंडस्ट्रीज अँंड अँग्रिकल्चरच्या ऐंशीव्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून पवार बोलत होते. मराठा चेंबरचे अध्यक्ष एस. के. जैन, येस बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर आदी उपस्थित होते.

‘माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उर्जा क्षेत्रातील खासगी गुंतवणूकीला मी प्राधान्य दिले होते. त्यामुळे माझ्या काळात उर्जा क्षेत्रातल्या गुंतवणूकीत भरघोस वाढ झाली. एन्रॉन कंपनी यातूनच आली. पुढे एन्रॉनला विरोध झाला. चार वर्षे प्रकल्पच सुरु होऊ शकला नाही. त्यामुळे काय झाले हे महाराष्ट्राने अनुभवले. लवासाच्याबाबतीत हेच झाले. या प्रकल्पासाठी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली. सुरवातीला कोणाचा विरोध नव्हता. नंतर अडथळे आले. प्रकल्प रखडला. आता दर शनिवार-रविवारी दहा हजार पर्यटक ‘लवासा’ला भेट देतात,’ हे पवारांनी आवर्जुन सांगितले.

पुढील स्लाइडमध्ये, कशी सुचली पवारांना कल्पना...