आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपिटीला राष्ट्रीय संकट जाहीर केल्याने काय होईल, पवारांचा उलट सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे / मुंबई - शेतक-यांनी संकटांना घाबरून जाऊन आपल्या कुटुंबाला आणखी संकटात टाकू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले आहे. त्याच बरोबर विरोधांनी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी ही मागणी फेटाळत, त्याने काय होईल असा उलट सवाल त्यांनी केला आहे. पुणे येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
उद्या मंत्रीगटाची बैठक दिल्लीत होत आहे. त्यात निवडणूक आयोगाची संमती घेऊन या परिस्थितीत शेतक-यांना कशी मदत करता येईल, यावर विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात झालेली गारपीट ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी अशी मागणी विरोधीपक्षांनी केली आहे. त्या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर पवारांनी पत्रकारालाच त्याने काय होईल, असा उलट सवाल केला.भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत, राज्यात झालेली गारपीट राष्ट्रीय आपत्तीच आहे, केंद्र सरकारने त्या दृष्टीकोणातूनच राज्यातील शेतक-यांना मदत करावी याचा पुनरुच्चार केला आहे. पवारांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
शेतक-यांनी आत्महत्या करु नये असे आवाहन करतानाच पवारांनी शेतक-यांना मदत करण्यासाठी आचारसंहिता आड येणार नसल्याचेही स्पष्ट केले. ऊस उत्पादक शेतक-यांच्या नुकसानीवर ते म्हणाले, राज्यातील ऊसाचे नुकसान झाले आहे, मात्र, मोठ्या प्रमाणात नाही. काही क्षेत्रावरील ऊस पुनर्जीवती करण्याचा कार्यकम तयार केला जात आहे. नुकसानीचा एकंदर उत्पादकतेवर परिणाम होईल एवढे नुकसान दिसत नाही. पुढच्या वर्षी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे गळीतावर परिणाम होणार नाही.