आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवळीक वाढली: शरद पवारांची ‘जीएम उसा’साठी नरेंद्र मोदींकडे साखरपेरणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सर्वाधिक पाणी पिणारे पीक म्हणून उसाची ओळख आहे. दुष्काळाच्या काळात उसाची अधिक बदनामी होते. यावर उपाय म्हणून कमीत कमी पाण्यात अधिक साखर उतारा देणाऱ्या जेनेटिकली मॉडिफाइड (जनुकीय सुधारित-जीएम) ऊस वाणावर इंडोनेशियात संशोधन झाले आहे. हे जीएम वाण भारतात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रात आपले वजन खर्ची घातले आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री असलेले पवार जीएम तंत्रज्ञानाला अनुकूल आहेत. त्यांच्या कार्यकाळातच देशात वांगे, मोहरी व मक्याच्या जीएम वाणांच्या चाचण्या सुरू झाल्या. मात्र ‘आहारात समावेश असलेल्या पिकात जीएम नको’ असे सांगत स्वयंसेवी संस्थांनी कडाडून विरोध केला. हा जीएम विरोध कोर्टाच्या पायरीवर गेला तेव्हा जीएम पिकांच्या चाचण्यांवर सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्बंध लादले. या पार्श्वभूमीवर जीएम उसाची तांत्रिकता तपासणे गरजेचे झाले आहे. म्हणूनच पवारांनी मंगळवारी (ता. २०) भारतीय कृषी अनुसंधान परिषदेत जीएम उसाची खास बैठक आयोजित केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नुकत्याच झालेल्या बारामती दौऱ्यातसुद्धा पवारांनी जीएम उसाच्या लागवडीची गरज त्यांच्या कानावर घातली. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात सरकारने पर्यावरण मंत्रालयाच्या अखत्यारीत जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी स्थापन केली. सध्या हे मंत्रालय प्रकाश जावडेकरांकडे आहे. जीएमसंदर्भात जावडेकर सकारात्मक असल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जीएम कापसाची किमया जवळून पाहिली असल्याने त्यांच्याकडूनही जीएम उसाला विरोध होण्याची शक्यता कमी आहे.

पुढे वाचा.. दुष्काळ प्रतिबंधक अन‌् अधिक गोडी