आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांनी हातात घेतला \'भाजप\'चा झाडू, मोदींच्या स्‍वच्‍छ भारत अभियानास पाठिंबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राष्‍ट्रवादी आणि भाजपचे 'प्‍यार के दिन' सुरू झाले आहेत. राष्‍ट्रवादीला 'भ्रष्‍टवादी' म्‍हणून संबोधणारे नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आगपाखड करणारे शरद पवार चक्क हातात झाडू घेऊन 'स्‍वच्‍छ भारत' अभियानात सहभागी झाले आहेत. त्‍यांनी मोदींच्‍या अभियानाचे कौतूक करत या अभियानाला सुरूवात केली आहे.
महाराष्‍ट्रात स्‍वच्‍छता सप्‍ताहाचे आयोजन करण्‍यात आले आहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हातात झाडू घेऊन मुंबईमध्‍ये अभियानाला सुरूवात केली तर पवारांचा बालेकिल्ला म्‍हणून ओळखल्‍या जाणार्‍या बारामतीमध्‍ये शरद पवार यांनी आपल्‍या परिवारासोबत या अभियात भाग घेतला. यावेळी शरद पवार यांच्‍यासोबत खा. सुप्रिया सुळे, माजी उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती पाहायला मिळाली. पवार कुटुंबासोबत या अभियात एनसीपीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पुढील स्‍लाईडवर पाहा, शरद पवार यांनी कसा घेतली हाती भाजपचा झाडू... राबवले स्वच्छता अभियान...