आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bday: जेव्हा मोदी म्हणाले- शरद पवारांकडून राजकारण शिकलो, वाचा पवारांचा जीवनप्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - लोकनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज (सोमवार) 75 वा वाढदिवस आहे. गेल्या तीन-चार दशकांपासून शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय भूमिका बजावली आहे. त्यामुळे पवार म्हणजे पॉवर असा शब्द राज्याच्या राजकारणात रुळला. केवळ महाराष्ट्रातीलच नेते मंडळीच नव्हे तर खुद्द पंतप्रधान मोदी सांगतात, की मी पवारांकडून राजकाण शिकलो. यावरुन राष्ट्रीय राजकारणातील पवार यांचे महत्त्व अधोरेखीत होते.
शरद पवारांनी आज 76 व्या वर्षांत प्रवेश केला आहे. 12 डिसेंबर 1940 रोजी त्यांचा जन्म बारामती जिल्ह्यातील काटेवाडीत झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षण मंत्री, कृषिमंत्री आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. 2005 ते 2008 या कालावधीत ते बीसीसीआयचे चेअरमन होते. 2010 ते 2012 मध्ये ते आयसीसीचे अध्यक्ष होते. 1999 मध्ये कॉंग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. आज आम्ही तुमच्यासमोर शरद पवार यांचा जीवनप्रवास मांडणार आहोत...

विद्यार्थी चळवळीतून झाने लोकनेते
शरद पवार यांना कुठलीही राजकीय पार्श्‍वभूमी नाही. ते महानगरात किंवा मोठ्या शहरातही जन्‍मलेले नाही. सामान्‍य शेतकरी कुटुंबात त्‍यांचा जन्‍म झाला. त्‍यांच्‍याकडे त्‍यांचे समकालीन नेते बाळासाहेब ठाकरेंसारखे वक्तृत्व नव्‍हते. सभेलाही फारशी गर्दी होत नव्‍हती. जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्तेही नव्‍हते. त्‍यांच्‍या व्‍यक्‍तव्‍याने कधी कुठे दंगा झाला नाही किंवा कुणाच्‍या भावना भडल्‍या नाहीत. ते कधीही कोणता आदेश देत नाहीत. पण, केवळ आपली दूरदृष्‍टी शांत, संयमी स्‍वभाव याच्‍या बळावरचकेवळ महाराष्‍ट्राच्‍याच नाही तर देशाच्‍या राजकारणात मैलाचा दगड ठरलेत. विद्यार्थी चळवळीपासून सुरू झालेले त्‍यांचे राजकारण आज एका राष्‍ट्रीय पक्षाच्‍या संस्‍थापकापर्यंत येऊन ठेपले आहे.
प्रतिभाताईंशी झाले शरद पवार पवारांचे लग्‍न
1 ऑगस्ट 1967 या दिवशी बारामती येथे शरद पवार आणि प्रतिभा यांचा विवाह झाला. प्रतिभा या पुण्यातील सदू शिंदे या प्रसिद्ध माजी कसोटी क्रिकेटपटू यांच्या कन्या. पवार साहेबांना उत्तम प्रतिभेची साथ लाभल्याने त्यांच्या संसाररुपी वेलीला 'सुप्रिया' नावाचे एक कन्यारत्न प्राप्त झाले. आपल्या वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून सुप्रिया पवार-सुळे यांनी देखील स्वकर्तुत्त्वाचा ठसा उमटवला. सुप्रिया या बारामतीच्या खासदार आहेत. पवार साहेब आणि प्रतिभा या गेली पाच दशकांपासून सोबत आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, कसे जुळले शरद पवारांचे लग्न ?
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...