आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाकरी फिरवा; नव्यांना संधी द्या - शरद पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘आम्ही कुठेतरी थांबले पाहिजे. नव्यांना संधी द्यायला पाहिजे. चव्हाण साहेब सांगायचे भाकरी फिरवायला पाहिजे,’असे विधान करत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी नव्यांना संधी देण्याचे आवाहन केले.

पुणे लोकसभा मतदारसंघातील कॉँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. भाजपचा पारंपरिक मतदार असलेल्या शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदानात त्यांची सभा झाली. पुढील सभा असल्याने कदम आपले भाषण संपवून निघून गेले. त्यानंतर पवारांचे भाषण झाले.‘यशवंतराव चव्हाण साहेब नेहमी सांगायचे, भाकरी फिरवायला पाहिजे. नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे,’ असे पवार म्हणाले.

युवक कॉँग्रेसचा अध्यक्ष असताना सत्ताविसाव्या वर्षी यशवंतरावांनी मला बारामतीचे तिकीट दिले. त्यानंतर चौदावेळा निवडणूक लढवली. कंटाळा आला. तुम्ही मला पाडतच नाही, म्हणून म्हटले जायचे तर आता राज्यसभेत जाऊ,’ असेही पवार मिश्किलपणे म्हणाले. कॉँग्रेसने पुण्यात नवा उमेदवार दिला असल्याचा संदर्भ देऊन पवार बोलले. मात्र, त्यांनी दिलेल्या उदाहरणानंतर श्रोत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. सभा संपल्यावर पवारांनी नेमका काय ‘संदेश’ दिला याचीच चर्चा श्रोत्यांमधे रंगली होती.