आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले तर तसे बॅंकेत दिलेले पत्र का दाखवत नाही; शरद पवारांचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाले, असे पत्र बॅंकेत दिले तर ते दाखवत का नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या वेळखाऊ, किचकट आणि तथाकथित पारदर्शक अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवर चोहोबाजूने टीका होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

जागतिक मधमाशी दिवस व कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पवार बारामतीत आले होते. यावेळी मधूसंदेश प्रकल्पाअंतर्गत उत्कृष्ट शेतकऱ्यांना पुरस्कार त्यांच्या हस्ते देण्यात आला.  हवामान खात्याचा दमदार पावसाचा अंदाज खरा ठरला. तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालू, असे ते म्हणाले. मान्सून लांबलाय त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आहे. दुबार पेरणी हे शेतकऱ्यांवर आर्थिक संकटच आहे, असे सांगून पवारांनी पावसाच्या अनिश्चितेवर चिंता व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...