आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाना पटोलेंविषयी काय बोलणार? शहाण्या माणसांबद्दल बोलावे; शरद पवारांचे पुण्यात वक्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शहाण्या माणसांबद्दल बोलावे, नाना पटोलेंविषयी काय बोलणार? या शब्दात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि  माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले. केंद्र सरकार, व त्यातही पंतप्रधान कौशल्य विकासाविषयी आग्रही दिसत आहेत. मात्र त्यांच्या योजना कृतीत यायला हव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

 

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या राजर्षी शाहू अकँडमीचे उदघाटन पवार यांच्या हस्ते झाले. संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत सूतार , माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, मधुकर कोकाटे व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.  देशातील उद्योगांची कौशल्य असलेली माणसे मिळत नाही अशी तक्रार आहे व दुसरीकडे रोजगार नाही असे वातावरण आहे. यात बदल व्हावा असे पवार म्हणाले.

 

शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळाले तर लगेच आरडाओरडा 

शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळाले तर लगेच आरडाओरडा सुरू करू नये, सरकारने थोडे नुकसान सोसावे. आपल्या एकूण खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांवर किती खर्च होतो याचा सरकारने विचार करावा असे पवार यांनी सांगितले. बीटी बियाणांवर पुन्हा संशोधन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आता अळी जास्त शक्तीमान झाली आहे, बियाणांमधील प्रतिबंधकांना दाद देत नाही असे त्यांनी सांगितलै. नाविन्यपुर्ण कल्पना व कौशल्याधारीत मनुष्यबळ या आघाडीवर देशात आज निराशेचे वातावरण आहे. यात बदल करायचा असेल तर देशभरातील शिक्षणसंस्थांनी एकत्र येउन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

बातम्या आणखी आहेत...