आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरेच्या दराकडे लक्ष देऊ नका; शरद पवारांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - शेतकऱ्यांच्या नशिबाने सध्या साखरेला चांगला भाव मिळतो आहे. त्यामुळे बाजारात साखरेचे भाव कडाडल्याने दिल्लीत केंद्र सरकार चिंतेत पडले आहे. ग्राहकाचे हित जोपासण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना विरोध नाही. मात्र गेली दोन वर्षे कर्ज काढून साखर कारखाने चालवले. ते कर्ज फिटेपर्यंत साखरेच्या भावाकडे अजिबात लक्ष देऊ नये. शेतकऱ्याच्या डोक्यावरील ओझे कमी झाल्यावर साखरेच्या भावाचे बघू... दोन वर्षे साखर कारखानदारांना बसलेला आर्थिक फटका भरून निघेपर्यंत मोदी सरकारने गप्प बसावे, असा इशारा शरद पवार यांनी बारामतीत दिला. ते बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
देशातील साखर उत्पादन कमालीचे घटले असून राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर येत्या ऊसगाळप हंगामात फक्त पुणे विभागातील कारखाने चालू राहण्याची चिन्हे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
आयात साखर महागच
साखरेच्या कमी उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर आयात करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तरी परदेशातून आयात साखर ही भारतात उत्पादित साखरेच्या तुलनेत महाग पडते. मुंबईच्या बंदरात परदेशी साखर त्रेचाळीसशे रुपये क्विंटल पडते. मग बाजारात तिचा भाव काय.. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देशातील तेहतीसशे रुपये क्विंटल मिळणारी साखर सोडून महाग परदेशी साखर व्यापारी आयात करणार नाहीत. हीच संधी मानून शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर अधिक ऊस उत्पादन घ्यायला शिकून फायदा करून घ्यावा, असे अावाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.