आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Participated In PM's Clean India Mission

शरद पवारांच्या हाती पंतप्रधान माेदींचा ‘झाडू’, बारामतीत राबवले स्वच्छता अभियान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी देशभर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार डी. पी. त्रिपाठी यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी बारामतीतील स्वच्छता माेहिमेत सहभाग नाेंदवला.
बारामती - राज्यातील भाजप सरकारला न मागता पाठिंबा जाहीर करत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याशी जवळीक वाढवणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी बारामतीत ‘स्वच्छ भारत अभियाना’त सहभाग नाेंदवून माेदींच्या माेहिमेस हातभार लावला. राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या नगर परिषदेतर्फे आयाेजित या स्वच्छता माेहिमेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचाही सहभाग हाेता.
फडणवीस सरकारला तारण्यात यशस्वी भूमिका बजावणा-या शरद पवारांची भाजपशी वाढत असलेली जवळीक केवळ राज्यातच नव्हे, तर देशभर चर्चेचा विषय बनली आहे. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर माेदींनी सर्व भारतीयांना स्वच्छतेचा नारा दिला हाेता. या माेहिमेला देशभर चांगला प्रतिसाद मिळत असताना शरद पवार, त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे व पुतणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे खासदार डी. पी. त्रिपाठी यांनी शुक्रवारी सकाळी ‘स्वीपर’ (झाडू) हाती घेऊन बारामतीतील वंदे मातरम् या डांबरी रस्त्यावर प्रातिनिधिक स्वरूपात स्वच्छता केली. बारामती नगर परिषदेतर्फे या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.

या वेळी स्वच्छ भारत अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करताना पवारांनी माेदींचे नाव घेणे मात्र टाळले. बारामतीच्या नागरिकांनी महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी ८ ते १० या वेळेत आपला परिसर स्वच्छ करावा, असे आवाहन शरद पवारांनी केले. दरम्यान, पालिकेने आयाेजित केलेल्या या माेहिमेअंतर्गत शहरातील सामाजिक संस्थांनी व शासकीय कर्मचा-यांनी कार्यालय व शहराचा काही भाग स्वच्छ केला.