आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे जुळले होते शरद पवारांचे लग्न, मोठे बंधू म्‍हणाले- माझा भाऊ रिकामटेकडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवार आणि प्रतीभाताईंचा दुर्मिळ फोटो - Divya Marathi
शरद पवार आणि प्रतीभाताईंचा दुर्मिळ फोटो
बारामती - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्‍या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राचे प्रकाशन येत्या 10 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत होत आहे. त्‍यानंतर 12 डिसेंबरला त्‍यांचा वाढदिवस आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com विशेष वृत्‍तमालिकेतून सांगणार आहे महाराष्‍ट्रातील या ज्‍येष्‍ठ नेत्‍याचे काही रंजक किस्‍से. त्‍यातील पहिल्‍या भागात वाचा शरदरावांचे लग्‍न कसे जुळले याची रंजक माहिती....
विद्यार्थी चळवळीतून झाने लोकनेते
शरद पवार यांना कुठलीही राजकीय पार्श्‍वभूमी नाही. ते महानगरात किंवा मोठ्या शहरातही जन्‍मलेले नाही. सामान्‍य शेतकरी कुटुंबात त्‍यांचा जन्‍म झाला. त्‍यांच्‍याकडे त्‍यांचे समकालीन नेते बाळासाहेब ठाकरेंसारखे वक्तृत्व नव्‍हते. सभेलाही फारशी गर्दी होत नव्‍हती. जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्तेही नव्‍हते. त्‍यांच्‍या व्‍यक्‍तव्‍याने कधी कुठे दंगा झाला नाही किंवा कुणाच्‍या भावना भडल्‍या नाहीत. ते कधीही कोणता आदेश देत नाहीत. पण, केवळ आपली दूरदृष्‍टी शांत, संयमी स्‍वभाव याच्‍या बळावरचकेवळ महाराष्‍ट्राच्‍याच नाही तर देशाच्‍या राजकारणात मैलाचा दगड ठरलेत. विद्यार्थी चळवळीपासून सुरू झालेले त्‍यांचे राजकारण आज एका राष्‍ट्रीय पक्षाच्‍या संस्‍थापकापर्यंत येऊन ठेपले आहे.

प्रतिभाताईंशी झाले शरद पवार पवारांचे लग्‍न
1 ऑगस्ट 1967 या दिवशी बारामती येथे शरद पवार आणि प्रतिभा यांचा विवाह झाला. प्रतिभा या पुण्यातील सदू शिंदे या प्रसिद्ध माजी कसोटी क्रिकेटपटू यांच्या कन्या. पवार साहेबांना उत्तम प्रतिभेची साथ लाभल्याने त्यांच्या संसाररुपी वेलीला 'सुप्रिया' नावाची एक कन्यारत्न प्राप्त झाले. आपल्या वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून सुप्रिया पवार-सुळे यांनी देखील स्वकर्तुत्त्वाचा ठसा उमटवला. सुप्रिया या बारामतीच्या खासदार आहेत. पवार साहेब आणि प्रतिभा या गेली पाच दशकांपासून सोबत आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कसे जुळले शरद पवारांचे लग्न ?