आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमागे फरफटत जाण्यावाचून शिवसेनेला पर्याय नाही- शरद पवारांचे वक्तव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र- विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्यापासून कोल्हापूरातून प्रचाराला प्रारंभ होत आहे. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे)
कोल्हापूर- विधानसभा निवडणुकीत भाजप आपल्याला हव्या तेवढ्या जागा शिवसेनेकडून काढून घेईल. लोकसभेला शिवसेनेला मिळालेल्या यशात नरेंद्र मोदींचा वाटा होता याची जाण शिवसेनेच्या नेतृत्त्वाला असेलच. त्यामुळे भाजपच्या मागे फरफटत जाण्यावाचून शिवसेनेला पर्याय नाही असे मत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला उद्यापासून कोल्हापूरातून सुरुवात होत आहे. त्यासाठी शरद पवार आज कोल्हापूरात पोहचले आहेत. त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोल्हापूरातूनच झाल्याने प्रचाराचा नारळही येथूनच फोडणार असल्याचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस उद्यापासून विधानसभेसाठी प्रचार सुरु होत असून, लवकरच जाहीरनामाही प्रसिद्ध करू असे पवार यांनी सांगितले.
पवार म्हणाले, काँग्रेससोबत आघाडी व्हावी या मतांचे आम्ही आहोत. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये व सामाजिक ऐक्य कायम राहावे यासाठी आम्ही आघाडीसोबत निवडणूक लढविणार आहोत. सामाजिक ऐक्याचा विषय अतिशय महत्त्वाचा असून त्याबाबत राष्ट्रवादी काहीही तडजोड करणार नाही. जागावाटपाचे चित्र 3-4 दिवसात स्पष्ट होईल. काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष देशाच्या बाहेर असल्याने जागावाटपाला अंतिम स्वरूप आले नसेल पण आज त्या येत असल्याने याला गती प्राप्त होईल. जागावाटपाचा तिढा सुटताच दुस-याच दिवशी आम्ही आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करू, असेही पवार यांनी सांगितले.
काय काय म्हणाले शरद पवार कोल्हापूरातील पत्रकार परिषदेत, वाचा...
- सामाजिक ऐक्यासाठी राष्ट्रवादी आग्रही, याबाबत कोणतेही तडजोड करणार नाही
- लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभेचे निकाल वेगळे
- विधानसभेत पुन्हा आघाडी सत्तेत येईल
- जागावाटपाच्या चर्चेनंतर दुस-याच दिवशी यादी जाहीर करू
- केंद्र सरकारचा कारभार मोजक्याच लोकांच्या हाती
- भाजप सांगेल तेच शिवसेना ऐकेल
- लोकसभेतील विजय मोदींमुळे सुकर झाल्याची शिवसेनेला नक्कीच जाण असेल
- भाजपला पाहिजे तो आकडा मिळवण्यात यश मिळवेल
- पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा उद्यापासून प्रचार
- 2-3 दिवसात आघाडीच चित्र स्पष्ट होईल
- काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष देशाच्या बाहेर असल्याने बोलणी थांबली असावी
- जाहीरनामाही प्रसिद्ध करू
- राष्ट्रवादीची स्थापना कोल्हापूरातून झाल्याने प्रचाराचा नारळही येथून वाढविणार
- आघाडी रहावी व एकोप्याने लढावे असाच आमचा प्रयत्न.