आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Pubilic Meeting In Pune District Khed

शेतक-यांच्या मुलांनी औद्योगिक क्षेत्रातही कतृत्व दाखवावे - शरद पवार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शेतक-यांच्या मुलांनी केवळ शेतीवर अवलंबून राहू नये. औद्योगिक क्षेत्रातही कतृत्व निर्माण केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

खेड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे उदघाटन पवारांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप मोहिते उपस्थित होते.

शरद पवार यांनी यंदा पाऊस चांगला राहिले असे सांगतानाच, शेतक-यांनी जोड धंद्याकडे वळण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, शेती कशी उत्तम करता येईल याचा विचार केलाच पाहिजे. त्यासोबतच घरात दोन मुले असतील तर एकाला शेती आणि दुस-याला उत्तम शिक्षण देऊन उत्पन्नाचा दुसरा मार्ग निर्माण केला पाहिजे. केवळ शेतीवर अवलंबून राहू नये.

खेड आणि चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. तेथे अवश्यक असलेले कुशल कर्मचारी औद्योगिक संस्थातून तयार झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शुक्रवारी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन पवारांनी सर्वांनाच धक्का दिला आहे. त्यानंतर प्रथमच जाहीर कार्यक्रमात ते बोलणार असल्यामुळे, ते आज पुन्हा एखादा नवा धक्का देतात का, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते.