आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Situation Like Fish Without Water Khadse

शरद पवार यांची अवस्था पाण्याविना तडफडणा-या माशासारखी, खडसेंची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - सत्तेविना शरद पवारांची अवस्था पाण्याविना तडफडणा-यामाशासारखी असल्याची टीका महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी येथे रविवारी केली. खडसे म्हणाले, शरद पवार त्यांच्या राजकीय जीवनात सतत सत्तेवर राहिले. फार कमी काळ त्यांच्या हाती सत्ता नव्हती. आता राजकीय सत्ता नसल्याने त्यांना अस्वस्थ वाटतं. त्यांची अवस्था पाण्याविना तडफडणा-यामाशासारखी झाली आहे. म्हणून ते अधूनमधून मध्यावधी निवडणुकीचे पिल्लू सोडतात. यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणे हा पवारांचा एकमेव हेतू असतो. सरकार भक्कम असून मध्यावधी निवडणुकीची सर्वदूर शक्यता नाही, असेही त्यांनी या वेळी सांगितले.