आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निष्ठावंत कार्यकर्त्यांची उणीव, शरद पवार; साहेब आम्हाला बाळासाहेबांच्या जागी: नांदगावकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अलीकडच्या काळात राजकारणाचे व्यापारीकरण झाले अाहे. पूर्वी कार्यकर्ते कोणतीच अपेक्षा न ठेवता भेळभत्ता खाऊन नेत्यासाठी राबायचे. मात्र, सध्या निष्ठावान कार्यकर्त्यांची उणीव भासते, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. 


माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. पवार म्हणाले,   मामासाहेब माेहाेळ यांनी राजकारण, समाजकारण, सहकार व शिक्षण आदी क्षेत्रांत अभ्यासपूर्ण कार्यशैलीचा ठसा उमटवला. माेहाेळ कुटुंबीयांनी समाजातील शोषित, वंचित व उपेक्षितांशी नाळ कधी ताेडली नाही. राजकारण, शिक्षण, समाजसेवा, क्रिकेट आदी क्षेत्रांत अशाेक माेहाेळ यांनी कामाची छाप पाडली. पुण्यात सदानंद माेहाेळ, अशाेक माेहाेळ यांच्यासारखे उत्तम क्रिकेटपटू हाेते. त्यांनी देशाचे नेतृत्वही केले असते. मात्र, काही कारणास्तव त्यांना क्रिकेट थांबवावे लागले, याची पुणेकरांच्या मनात खंत होती. माझ्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (अायसीसी) अध्यक्षपद अाल्यानंतर ती दूर झाली. कार्यक्रमास पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,  पतंगराव कदम, दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बाेर्डे, माजी अामदार बाळा नांदगावकर उपस्थित हाेते.   

 

पुढील स्लाईडवर वाचा मनसे नेते बाळा नांदगावकर पवारांना काय म्हणाले...

बातम्या आणखी आहेत...