आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमने-सामने: पवारांचा पुतळा जाळला तर राज यांच्या पोस्टरला फासले काळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शरद पवार यांच्या पुतळ्याचे दहन केले. - Divya Marathi
मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शरद पवार यांच्या पुतळ्याचे दहन केले.
पुणे - बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी बुधवारी सकाळपासून मुंबापुरीत वादाचा धुरळा उडाला. राष्ट्रवादी काँग्रेेस, मनसे आणि जिजाऊ ब्रिगेडचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचा पुतळा जाळला, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या पोस्टरला काळे फासले. तसेच जिजाऊ बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी थेट सांस्कृतिकमंत्री विनोद तावडेंच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. काही जणींनी बंगल्यात कोंडून घेण्याचा प्रयत्न केला.

लालबाग येथील भारतमाता सिनेमाजवळ मनसे कार्यकर्त्यांनी पवार यांचा पुतळा जाळला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांना सोडून दिले. नंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लालबाग येथील मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या ऑफिसबाहेर निदर्शने केली. तसेच राज ठाकरे यांच्या पोस्टरला काळे फासून पुतळ्याचे दहन केले. पोलिसांनी कारवाई करत निदर्शने करणाऱ्या सर्व महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुरस्कारच्या दिवशीही निषेध जाहीरपणे व्यक्त केला. शिवाजी पार्कवर जाऊन ते कार्यकर्त्यांसह शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले आणि त्यानंतर सरकार तसेच पुरंदरेंविरोधात त्यांनी घोषणाबाजी केली. आमचा विरोध हा मुद्द्यांवर होता. त्याला जातीयवाद केल्याचा रंग देऊन विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा खऱ्या अर्थाने धांडोळा घेतला, तर पुरंदरे यांनी अनके गोष्टींचा विपर्यास केल्याचे दिसून येते, असा सूर आव्हाडांनी लावला.

जिजाऊ ब्रिगेडच्या महिला आक्रमक
विनोद तावडे यांच्या निवासस्थानाबाहेर जिजाऊ ब्रिगेडने आक्रमक आंदोलन करत पुरस्कार वितरण सोहळा थांबवण्याची मागणी केली, तर २० महिला कार्यकर्त्यांनी तावडेंच्या निवासस्थानात स्वत:ला कोंडून घेतले. पोलिसांनी लगेचच हस्तक्षेप करत या महिलांना अटक केली. या आंदोलनानंतर सर्वच मंत्र्यांच्या बंगल्यावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शरद पवार यांच्या पुतळ्याचे दहन केले.

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटो...