आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निसर्गसौंदर्य: राज्यात लवसासारखी 26 शहरे वसविणे शक्य- शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्र निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. त्याचा पर्यटनासाठी व पर्यायाने विकासासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. राज्यात लवासासारखी आणखी 26 शहरे उभारणे शक्य आहे. इंग्लंडप्रमाणे आपल्याकडेही अशी नियोजित शहरे वसविली गेली पाहिजेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. याचबरोबर विकासाच्या आड येणा-या शक्तींना महत्त्व न देता माध्यमांनी विकासाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅन्ड अग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) 80 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. पवार म्हणाले, महाराष्ट्राला निसर्गाचे सौंदर्य भेटले आहे. त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. इंग्लंडमध्ये अशाच निसर्गाने नटलेल्या टेकड्यांवर शहरे वसविली गेली आहेत. आपल्याकडे लवासासारखी अजून 26 शहरे उभा राहू शकतील अशी स्पेस आहे. ज्या भागात चांगले पाणीही आहे आणि तिथे टेकड्याही वसल्या आहेत तिथे-तिथे आपण लवासासारखी नियोजित शहरे वसवू शकतो.
इंग्लंडमध्ये होऊ शकते मग आपल्याकडे का नाही असा सवाल उपस्थित करीत तथाकथित पर्यावरणवादी व स्वयंसेवी संस्थांवर अप्रत्यक्षरित्या टीका करताना पवार पुढे म्हणाले, काही शक्तींना विकास आणि चांगले काही करायचे म्हटले की विविध बाबी आठवतात. माध्यमेही अशा लोकांना उचलून धरतात. त्यामुळे त्यांना आणखी जोर चढतो. माध्यमांनी विकासाच्या आड येणा-या लोकांकडे दुर्लक्ष करून विकासाभिमुख घटकांना चालनी दिली व त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. लवासाला एका वर्गाने मोठा विरोध केला. त्यामुळे चार-पाच वर्षे त्याचे काम रखडले. आज लवासासारख्या शहराला शनिवारी-रविवारी दहा हजाराहून अधिक लोक भेट देतात, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवितात. लवासा हे एक आज उत्तम पर्यटन शहर म्हणून विकसित होत आहे. पण अशी 26 शहरे राज्यात वसवणे शक्य आहे. जेथे मुबलक पाणी आहे, टेकड्या आहेत व निसर्गाने नटलेला परिसर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढे वाचा, पवारांना पुणे व परिसराबाबत काय वाटते ...