आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार यांची प्रकृती उत्तम, शुगर कमी झाल्‍यामुळे जाणवला थकवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची कोल्‍हापुरात प्रकृती अचानक बिघडली. त्‍यामुळे ते पुण्‍यात परतले आहेत. आता त्‍यांची प्रकृती उत्तम असल्‍याचे त्‍यांच्‍या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. पवारांना डॉक्‍टरांनी विश्रांतीचा सल्‍ला दिला आहे. पवार यांचा सांगली येथे कार्यक्रम होता. तो रद्द करण्‍यात आला आहे.

कोल्‍हापुरात पवार यांना अस्‍वस्‍थ वाटू लागले. त्‍यानंतर स्‍थानिक डॉक्‍टरांचा सल्‍ला घेण्‍यात आला. तसेच पुण्‍यातील तज्‍ज्ञांसोबतही चर्चा करण्‍यात आली. त्‍यानंतर पवार तात्‍काळ पुण्‍याकडे रवाना झाले.

पवार आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह एकाच मंचावर येणार होते. क्रांतीवीर पद्मभूषण नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त यांच्या स्मारकाच्या कोनशिलेच्या अनावरणाचा कार्यक्रम होणार होता. परंतु, पवार यांची रक्तशर्करा पातळी अचानक घटली. त्‍यामुळे त्‍यांना अस्‍वस्‍थ वाटू लागले.