आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांच्या 50 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीवर एक नजर, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या हिंदी आवृत्तीचे मंगळवारी सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार-लेखक कुलदीप नायर यांच्या हस्ते करण्यात आले. 12 डिसेंबर 2015 रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केल्याच्या निमित्ताने पवारांच्या 'लोक माझे सांगाती' या मराठी व 'ऑन माय टर्म्स' या इंग्रजी भाषेतील आत्मचरित्राचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आता 'अपनी शर्तों पर' या शीर्षकाने हिंदी अनुवाद केलेल्या आत्मकथेचे नायर यांच्या हस्ते झाले. 
 
शरद पवारांच्या संसदीय कारकीर्दीस मागील महिन्यातच 50 वर्षे पूर्ण झाली. 1967 साली सर्वप्रथम महाराष्ट्र विधानसभेवर ते निवडून गेले. त्यानंतर गेली 50 वर्षे विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या माध्यमातून त्यांनी राजकीय क्षेत्रात अखंडीतपणे राज्य-देशाची सेवा केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना नुकताच पदमविभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला. याचनिमित्ताने आज आपण शरद पवारांच्या कारकिर्दीवर फोटोजच्या माध्यमातून एक नजर टाकणार आहोत.
 
पुढे स्लाईडद्वारे फोटोजमधून पाहा, शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर....
बातम्या आणखी आहेत...