आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांची प्रकृती ठणठणीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोल्हापूरचा दौरा अर्धवट सोडून पुण्यात परतलेले पवार 24 तासांत ठणठणीत झाले आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सोमवारी सकाळी ते बंगळुरूला रवाना झाले. ते दोन दिवस बंगळुरू परिसरात असतील. या दौ-यात त्यांचे काही खासगी व सरकारी कार्यक्रम आहेत.

रविवारी कोल्हापूरच्या दौ-यावर असताना पवारांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करून ते तातडीने हेलिकॉप्टरने पुण्यात आले होते.

पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानी त्यांच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या. रक्तदाब, रक्तातील साखर तसेच ईसीजी या प्रमुख चाचण्यांचे निष्कर्ष स्थिर असल्याचे दिसून आले. फक्त कफचा त्रास दूर करणारे औषध त्यांना देण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. त्यानुसार पुढचे सर्व कार्यक्रम रद्द करून त्यांनी रविवारी विश्रांती घेतली.