आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar\'s Ncp Merge In Congress Digvijay Singh Advise

झालं गेलं विसरून शरद पवारांनी काँग्रेसमध्ये परत यावे- दिग्विजय सिंह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( कोल्हापूर येथील सद‌्भावना दौड कार्यक्रमात बोलताना दिग्विजय सिंह)
पंढरपूर- झालं गेलं विसरून शरद पवारांनी आपला राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा आपले जुने मित्र व सहकारी शरद पवारांना दिला आहे. बिहारमध्ये नितीशकुमार व लालूप्रसाद यादव हे कट्टर विरोधक एकत्र येत असतील महाराष्ट्रातही पवारांनी काँग्रेसमध्ये येण्यास काय हरकत आहे असे सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने दिग्विजय सिंह यांचा सल्ला धुडकावून लावला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस व ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे बुधवारी कोल्हापूर दौ-यावर होते. राजीव गांधी यांच्या जयंतीदिन आयोजित सद‌्भावना दौड कार्यक्रमानंतर काल सायंकाळी ते कोल्हापूरहून पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला आले होते. दिग्विजयसिंह हे पंढरपूरच्या विठ्ठलांचे मागील अनेक वर्षापासून भक्त आहेत. मध्यप्रदेशच्या 10 वर्ष मुख्यमंत्रीपदी असतानाही त्यांनी पंढरपूरच्या आषाढी एकादशीचे दर्शन हुकवले नव्हते. दरवर्षी ते पंढरपूरला येतात. तसेच विविध राजकीय व सामाजिक दौ-यानिमित्त ते महाराष्ट्रात आले की आर्वजून पंढरपूरला भेट देतात. काल रात्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
सिंह म्हणाले, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी गेल्या 15 वर्षापासून आहे. तसेच ती पुढेही कायम राहील. आमची ही आघाडी वैचारिक पातळीवर आहे व विचारधाराही एकच आहे. त्यामुळे शरद पवारांनी मागील काळात जे झालं ते विसरून आपला पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन करावा. बिहारमध्ये लालू-नितीश एकत्र येऊ शकतात तर आपण का नाही?. यावेळी बोलताना सिंह यांनी शरद पवारांचे कौतुक केले.
पुढे वाचा, शरद पवारांचे दिग्विजय सिंह यांनी कशा शब्दात केले कौतूक...
दिग्विजय सिंह यांच्या सल्लावर राष्ट्रवादीने काय दिली प्रतिक्रिया...