आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharukh Khan Doesn\'t Do That Thing; Supriya Sule Belive On King Khan

शाहरुख ‘तशी’ चाचणी करेल असे वाटत नाही; सुप्रिया सुळेंना विश्वास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - राज्यातील स्त्री भ्रूणहत्येविरोधात चळवळ उभारणा-या राष्‍ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे किंग खान शाहरुखच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. ‘शाहरुख खानने गर्भलिंगनिदान चाचणी करून घेतली आहे की नाही हे मला माहीत नाही. मात्र, तो एक जबाबदार मनुष्य आहे. तो अशी चाचणी करेल असे वाटत नाही. हे खरे असेल तर डॉक्टर कोण होता? याचीही आपण सर्वांनी मिळून चौकशी केली पाहिजे,’ अशा शब्दांत सुळे यांनी किंग खानबाबत विश्वास व्यक्त केला.


‘जागर जाणिवां’चा या राष्‍ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या मोहिमेबाबत माहिती देण्यासाठी खासदार सुळे यांनी बुधवारी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला. ‘आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील राष्‍ट्रवादी कॉँग्रेसच्या युवती जनतेचे प्रतिनिधित्व करताना दिसतील. लोकसभेत मात्र तूर्त दिसणार नाहीत. कारण या युवती आताच घराबाहेर पडून राजकारणात उतरल्या आहेत. त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले जात आहे. 2019 च्या निवडणुकीत यातील काही युवती नक्कीच खासदार असतील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


शासनाच्या क्रीडा धोरणाविषयी सुळे म्हणाल्या की, अनेक क्रीडा योजनांचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने या क्षेत्राकडे आता करिअर म्हणून पाहिले जात नाही. क्रिकेटचे मात्र व्यवस्थित चालू असून यात करिअरला संधी असल्याचे त्यांनी मान्य केले.


शासनाकडे पैसाच नाही
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. त्या तुलनेत महिलांचे संरक्षण करण्यासाठी राज्यात पोलिसांची संख्या मात्र कमी आहे याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यावर राज्य शासनाच्या तिजोरीत पैसा नसल्यामुळे पोलिसांची नवीन भरती होऊ शकलेली नाही, असे सांगत सुळे यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला.