आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमाशंकरमध्ये राज्य प्राणी शेकरूंची संख्या वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्य प्राणी म्हणून सर्वपरिचित असणार्‍या शेकरूंची संख्या भीमाशंकर अभयारण्यात वाढली आहे. शेकरूंची नवी साडेचारशे घरटी आढळली असल्याची महिती पुणे विभागाचे उपवनसंरक्षक सुनील लिमये यांनी येथे दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत शेकरूंची नवी घरटी वाढली आहेत, असेही ते म्हणाले.

राज्य प्राणी असणार्‍या शेकरूंच्या संरक्षणासाठी भीमाशंकर अभयारण्य प्रसिद्ध आहे. लालसर, शेंदरी रंगाचे शेकरूंना (जायंट स्क्व्ॉरल) उंच वृक्षांवर वावरताना, ठक ठक असा आवाज करताना आणि मोठी झुबकेदार शेपूट उडवत झाडांवरून पळताना पाहणे, हा एक आनंददायी अनुभव असतो. राज्यात शेकरू फक्त भीमाशंकर परिसरातच आढळतात. त्यामुळे दरवर्षी शेकरूंची गणना वनविभागातर्फे केली जाते. या वर्षी 19 मे ते 31 मेदरम्यान ही गणना करण्यात आली.

शेकरूंची वैशिष्ट्ये
- आयुर्मयादा सुमारे 11 वर्षे
- अधिवास : आंबा, हिरडा, बेहडा, अंजनी, माकडलिंबू असे उंच वृक्ष
- आवडते खाद्य : सर्व प्रकारची फळे, हिरवा पाला
- डिसेंबर-जानेवारी हा प्रजनन काळ असतो.
- साधारणपणे तिसर्‍या वर्षी शेकरू प्रजननक्षम होते.
- पिल्ले साधारणत: एप्रिल-मे महिन्यात जन्माला येतात.
- एक वर्षभर पिलू आईसोबत असते.

नवीन घरटी सुमारे 450
शेकरूंची संख्या काही प्रमाणात वाढली असल्याचे गणनेतून सिद्ध झाले आहे आणि हे एक सुचिन्ह आहे. शेकरूंचा अधिवास जसा सुरक्षित होत जाईल, तसे हे प्रमाण वाढेल. वनविभाग त्यासाठी प्रयत्नशील आहे. सुनील लिमये, उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग
भीमाशंकर अभयारण्यात 19 ठिकाणी गणना.